आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) Chalu Ghadamodi 2025

  *28 जानेवारी 2025* 


 *प्रश्न.1) महिला महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धा कोणी जिंकली आहे ?*

*उत्तर -* भाग्यश्री फंड


 *प्रश्न.2) प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्या कल्पनेवर आधारित चित्ररथांचे देखावे सादर करण्यात आले ?*

*उत्तर -* सुवर्ण भारत : वारसा आणि विकास


 *प्रश्न.3) माहेश्वरी साडीचे पुनर्जीवन करण्यात योगदान असलेल्या, पारंपारिक विणकाम व हातमाग तंत्राच्या कार्यकर्त्या सॅली होळकर यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?*

*उत्तर -* पद्मश्री


*प्रश्न.4) गोवा मुक्ती आंदोलनात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य योद्धा लिबिया लोबो यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?*

*उत्तर -* पद्मश्री


 *प्रश्न.5) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या 20-20 क्रिकेट मधील 2024 वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराचे मानकरी कोण ठरले आहे ?*

*उत्तर -* अर्षदीप सिंग


 *प्रश्न.6) विविध क्षेत्रात अतुल्य योगदान देणाऱ्या किती व्यक्तिमत्त्वांची यंदाच्या पद्म पुरस्कारांसाठी निवड झाली आहे ?*

*उत्तर -* 139


 *प्रश्न.7) राष्ट्रपती द्रोपदी द्रौपदी मुर्मू यांनी सुरक्षा दलातील किती कर्मचाऱ्यांना लष्करी सन्मान जाहीर केले आहेत ?*

*उत्तर -* 93


 *प्रश्न.8) भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे प्रबोवो सुबीयांतो हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत ?*

*उत्तर -* इंडोनेशिया


 *प्रश्न.9) माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे नुकतेच निधन झाले आहे ते 2023 मध्ये वर्धा येथे झालेल्या कितव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ?*

*उत्तर -* 96 व्या 


 *प्रश्न.10) राज्याचे अल्पसंख्यांक आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर शहरात स्थापन करण्यात आले आहे, आयुक्तालयाच्या आयुक्त पदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?*

*उत्तर -* विशाखा आढाव


Post a Comment

Previous Post Next Post