'मुख्यमंञी माझी लाडकी बहीण' योजनेतर्गंत मिळणारी आर्थिक मदत येत्या 15 ऑगस्ट रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यांत जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेंतर्गत सरकार २१ ते ६५ वर्ष वयोगटातील पाञ लाभार्थ्यांना दरमहा १५०० रुपयांचे अर्थसहाय्य करणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपञांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे.
राज्याचे अर्थमंञी अजित पवार यांनी नुकताच महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी बहुचर्चित मुख्यमंञी लाडकी बहीण योजना घोषित केली.
ही योजना १ जुलैपासून लागू झाली. तिचा जीआर जारी झाला. या महत्वकांक्षी योजनेचा राज्यातील ३.५० कोटी महिलांना लाभ होण्याचा अंदाज आहे. पण या योजनेचे पैसे केव्हा मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत होता. आता हा मुद्दाही स्पष्ट झाला आहे.
16 जुलैला लाभार्थ्यांची तात्पुरती यादी जाहीर होणार आहे व तसेच एक ऑगस्टला लाभार्थ्यांची अंतिम यादी लावण्यात येणार आहे.
आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे
१. रेशन कार्ड२. मतदार ओळखपत्र३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र४. जन्म दाखला या ४ पैकी कोणतेहे ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.3) सदर योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.4) सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात येत आहे.5) परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे १. जन्म दाखला २. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ३. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.6) रु.२.५ लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.7) सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
