RTE Admission 2024 प्रवेशाची निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर

 

  शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आरटीई 25% राखीव जागा वरील प्रवेशाची ठप्प असलेली प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पुन्हा सुरू होत आहे. त्यानुसार प्रवेशासाठी निवड यादी प्रतीक्षा यादी 20 जुलै रोजी जाहीर झाली आहे. पालकांना प्रवेशासाठीचे SMS सोमवारपासून पाठवले जाणार आहेत. 

     वंचित घटक सामाजिक आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत 25% राखीव जागांवर खाजगी शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. यंदा शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशाच्या नियमात बदल केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. परिणामी न्यायालयात याचिका दाखल होऊन प्रवेश प्रक्रिया ठप्प झाली. 

     मात्र शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशात केलेले बदल घटनाबाह्य असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता खाजगी शाळातील 25% राखीव जागांवरील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.


आरटीई कायद्या काय सांगतो?

  • भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 (अ) नुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे अनिवार्य आहे. 
  • संसदेने 4 ऑगस्ट 2009 रोजी शिक्षण हक्क कायदा आरटीई मंजूर केला. त्यानंतर एक एप्रिल 2010 रोजी याची अंमलबजावणी सुरू झाली.
  • आरटीई अंतर्गत खाजगी शाळातील 25% राखीव जागावर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या प्रवेशासाठी राज्य सरकारकडून खाजगी शाळांना शुल्काची प्रतिपूर्ती केली जाते.


खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर RTE ऍडमिशन 2024-25 अंतर्गत प्रवेशाची निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर झालेली आहे.

निवड यादी मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 93,009 आहे. व प्रतीक्षा यादी मध्ये एकूण 71,276 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

 

खालील लिंक वरून प्रवेशाची निवड यादी व प्रतीक्षा यादी चेक करू शकता.   Click Here


आरटीई प्रवेशाची निवड यादी व प्रतीक्षा यादी कशाप्रकारे चेक करायची याची संपूर्ण माहिती खालील व्हिडिओ मध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही पाहू शकता.












Post a Comment

Previous Post Next Post