संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇
प्ले स्टोअरवरून नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड करा.*
📲 नारी शक्ती दूत App Link 👇*
सुरुवातीला तुम्ही प्रोफाइल अपडेट करून घ्या.
स्वतः साठी अर्ज करत असल्यास त्या ठिकाणी सामान्य महिलावर क्लिक करा.
होम पेजवर आल्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावर क्लिक करा. फॉर्ममध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरा. सर्व माहितीसह बँकेचा तपशील व्यवस्थित न चुकता भरा.
बँकेचा तपशील भरताना त्या ठिकाणी आयएफएससी कोड, बँक अकाउंट नंबर याची खात्री करून घ्या.
खालील प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
(१) आधार कार्ड अपलोड करा.
(२) अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे
१. रेशन कार्ड
२. मतदार ओळखपत्र
३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
४. जन्म दाखला या ४ पैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत. ते तुम्ही अपलोड करू शकता.
(३) उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.
तुम्ही तुमचे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड उपलब्ध असेल तर ते अपलोड करू शकता.
(४) अर्जदाराने हमीपत्र डाऊनलोड करून त्याच्यावर सही करून ते अपलोड करा. हमीपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
(5) बँकेचे पासबुक अपलोड करा.
(6) अर्जदाराने स्वतःचा लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे.
अर्ज सबमिट करण्याच्या अगोदर सर्व माहिती व्यवस्थित आहे की नाही ते चेक करा व नंतरच अर्ज सबमिट करा.
